Wednesday, 11 October 2017

शिवराय - एक अष्टावधानी व्यक्तीत्व

गो ब्राह्मण प्रतिपालक याचा अर्थ काय ?
गो (गाई) -  गाईचे दुध आरोग्य वर्धक आहे , त्याने प्रजा सुदृढ राहते ...!!!
ब्राह्मण ( विद्वान ) - विद्वान वेळोवेळी राज्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात त्यामुळे राज्यकारभार व्यवस्थित चालण्यास मदत होते ...!!!
     ह्या दोघांचे रक्षण करणे राज्याच्या हिताचे ठरते . शक्ती  आणि युक्तीचा संगम म्हणून महाराजांची ओळख सर्वश्रुत आहे ...!!!
    शिवाजी महाराज खरोखरंच जाणता  राजा असल्याने वरील दोन्ही गोष्टी महाराजांनी संवर्धीत केल्याचे त्यांच्या एकंदर कारभारातुन जाणवते ...!!!
त्यांनी स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेतले की नाही हा विषय जरी संशोधनाचा असला तरी त्यांचा कारभार मात्र या पदवी योग्य होता ...!!!
  आपल्या अष्टप्रधान मंडळात त्यांनी बहुसंख्य ब्राह्मणांनाच स्थान दिल्याचे आढळते ...!!!
    शिवरायांच्या नावापुढे अनेकांनी अनेक बिरुदावल्या लावल्या , जसे क्षत्रिय कुलावतंस , गो ब्राह्मण प्रतिपालक ,, हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडी भुषण आणि बर्याच ...!!!
     शिवरायांचा एकंदर कारभार पाहता ते या सर्व उपाधीस योग्य आहेत हे लक्षात येते ...!!!
      महाराजांनी मुसलमानांना देखिल चाकरीस ठेवले होते ... हा त्यांच्या मुत्सदी पणाचा , राजकारणाचा भाग आहे . शत्रुला समजून घेण्यासाठी हे दुवे नक्कीच त्यांच्या कामी आले असतील ...!!!
अनेक मराठे आणि ब्राह्मण पण नव्हते का मुसलमानांची चाकरी करत ???
मग त्यावरून हे मुस्लिम शासक हिंदूना आपले किंवा प्रिय माणणारे आणि सर्वसमावेशक ठरतील काय ...???
   महाराजांचे व्यक्तीत्व हे बहुआयामी होते .. कुठल्याही एका कोनातुन पाहुन त्यांच्या विषयी बोलणे परिपूर्ण होणार नाही  ...!!!
      दगलबाज अफजल खानाला जावळीच्या जाळीत आणण्यासाठी पंतोजी बोकील सारखा निष्णात वकील पाठवणे , आग्र्यातुन सुटण्यासाठी वापरलेली युक्ती   ,  सिद्धी जौहरच्या वेढ्यातुन निसटून जाण्यासाठी उपयोगात आणलेली शक्कल , हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी जोडलेली जीवास जीव देणारी माणसे , हिंदवी स्वराज्या विरोधी उठणार्या प्रत्येकाचे निर्दालन त्यांनी कुठलीही भीडभाड न ठेवता केले होते त्यात स्वकिय्य देखिल होतेच ...!!!
     ध्येय प्राप्ती साठी ही धाडसी पाऊले त्यांनी उचलली म्हणून तर स्वराज्याचे स्वप्न साकार होऊ शकले ...!!!े