गो ब्राह्मण प्रतिपालक याचा अर्थ काय ?
गो (गाई) - गाईचे दुध आरोग्य वर्धक आहे , त्याने प्रजा सुदृढ राहते ...!!!
ब्राह्मण ( विद्वान ) - विद्वान वेळोवेळी राज्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात त्यामुळे राज्यकारभार व्यवस्थित चालण्यास मदत होते ...!!!
ह्या दोघांचे रक्षण करणे राज्याच्या हिताचे ठरते . शक्ती आणि युक्तीचा संगम म्हणून महाराजांची ओळख सर्वश्रुत आहे ...!!!
शिवाजी महाराज खरोखरंच जाणता राजा असल्याने वरील दोन्ही गोष्टी महाराजांनी संवर्धीत केल्याचे त्यांच्या एकंदर कारभारातुन जाणवते ...!!!
त्यांनी स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेतले की नाही हा विषय जरी संशोधनाचा असला तरी त्यांचा कारभार मात्र या पदवी योग्य होता ...!!!
आपल्या अष्टप्रधान मंडळात त्यांनी बहुसंख्य ब्राह्मणांनाच स्थान दिल्याचे आढळते ...!!!
शिवरायांच्या नावापुढे अनेकांनी अनेक बिरुदावल्या लावल्या , जसे क्षत्रिय कुलावतंस , गो ब्राह्मण प्रतिपालक ,, हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडी भुषण आणि बर्याच ...!!!
शिवरायांचा एकंदर कारभार पाहता ते या सर्व उपाधीस योग्य आहेत हे लक्षात येते ...!!!
महाराजांनी मुसलमानांना देखिल चाकरीस ठेवले होते ... हा त्यांच्या मुत्सदी पणाचा , राजकारणाचा भाग आहे . शत्रुला समजून घेण्यासाठी हे दुवे नक्कीच त्यांच्या कामी आले असतील ...!!!
अनेक मराठे आणि ब्राह्मण पण नव्हते का मुसलमानांची चाकरी करत ???
मग त्यावरून हे मुस्लिम शासक हिंदूना आपले किंवा प्रिय माणणारे आणि सर्वसमावेशक ठरतील काय ...???
महाराजांचे व्यक्तीत्व हे बहुआयामी होते .. कुठल्याही एका कोनातुन पाहुन त्यांच्या विषयी बोलणे परिपूर्ण होणार नाही ...!!!
दगलबाज अफजल खानाला जावळीच्या जाळीत आणण्यासाठी पंतोजी बोकील सारखा निष्णात वकील पाठवणे , आग्र्यातुन सुटण्यासाठी वापरलेली युक्ती , सिद्धी जौहरच्या वेढ्यातुन निसटून जाण्यासाठी उपयोगात आणलेली शक्कल , हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी जोडलेली जीवास जीव देणारी माणसे , हिंदवी स्वराज्या विरोधी उठणार्या प्रत्येकाचे निर्दालन त्यांनी कुठलीही भीडभाड न ठेवता केले होते त्यात स्वकिय्य देखिल होतेच ...!!!
ध्येय प्राप्ती साठी ही धाडसी पाऊले त्यांनी उचलली म्हणून तर स्वराज्याचे स्वप्न साकार होऊ शकले ...!!!े
Ravindra Kisanrao Zambare patil
Wednesday, 11 October 2017
शिवराय - एक अष्टावधानी व्यक्तीत्व
Wednesday, 20 September 2017
असेही एक प्रबोधन
असेही एक प्रबोधन
----------------------------------
दुपारची वेळ , पाऊस चालु होता त्यामुळे मी ही दुकानात आरामशीर होतो..... ईतक्यात एक साधारण तोंड ओळख असलेली व्यक्ती दुकानात आली ...!!!
तो - जय भिम !
मी - जय भिम !
व्यक्ती आनंदी झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते . जुजबी गप्पा झाल्यानंतर मुळ विषयाला तोंड फुटले ...!!!
त्याचा रोख जातीयतेकडे होता , भारतात जातीयवाद मोठ्या प्रमाणावर होतो , हिंदूध्रर्मात जातीयवाद आहे , अंधश्रद्धा आहेत , ब्राह्मणांच्या मुळे हे सर्व जोपासले जात आहे , भारताला आंबेडकरी विचारांची आणि बौध्द धम्माची गरज आहे असे त्याचे म्हणणे होते ...!!!
मी - जातीवाद होतोय हे खरं आहे पण हे फक्त ब्राह्मणांच्या मुळे होतय का ? सर्वच ब्राह्मण जातीवादी आहेत का ? किंवा बाकिचे सर्व समतावादी आहेत का?जाती ब्राह्मणांनी तयार केल्या का ? कालबाह्य झालेली मनुस्मृती नावाची घटना दहन करायला ब्राह्मण नव्हते का े आंबेडकरांच्या बरोबर ? जातींना धार्मिक आधार आहे हे दाखवून द्या . चातुर्वर्ण व्यवस्था सुध्दा जन्मानुसार नाही , ती त्याच्या गुण आणि त्यायोगाने येणार्या कर्मानुसार आहे . हीच वर्ण व्यवस्था संपूर्ण जगात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष े पणे पाळली जातेच की ...
उदा:- एखाद्या कार्यालयातील कर्मचारी वर्गात ज्याच्याकडे अधिक ज्ञान आहे तो अधिकारी असतो तर कमी ज्ञान असणारा शिपाई . जर शिपायाने अधिकारी वर्गाचे काम केले तर साजेल का ? त्यासाठी योग्य ज्ञान लागेल की नाही ? कुठल्याही समाजाचेही असेच असते ...!!!
तो :- आमच्या धम्मामधे समता बंधुता आहे , आम्ही अहिंसावादी आणि विज्ञानवादी आहोत , कुठलीही अंधश्रद्धा पाळत नाही .
मी :- प्रत्येक धर्मात ही विषमता तुम्हाला कमी अधिक प्रमाणात दिसुन येईल नीट पाहिले तर ...
ख्रिश्चन - कॅथलीक , प्रोटेष्टंट
मुस्लिम - शिया , सुन्नि
बौध्द - महायान , हिनयान वज्रयान तसेच त्याचे अनेक पोटपंथ . आंबेडकरांचा नवबौध्द हा त्याहुनही वेगळा आहे ... त्यातील २२ प्रतिज्ञा केवळ हिंदूधर्माला छेद देण्यासाठी दिल्या आहेत हे स्पष्टपणे दिसते ...!!!
मी हिंदूधर्मातील कोणत्याही देवतेस मानणार नाही व गणपती बसवणार नाही ... आंबेडकरांच्या नवबौध्द धम्मातील २२ प्रतिज्ञा पैकी ही एक प्रतिज्ञा ... भाऊ कदम या नवबौध्द कलाकाराने घरात गणपती बसवला म्हणून त्याला बहिष्कृत करण्याची धमकी देणार्यांनी आंबेडकरानी घटनेत दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान केला घटनेचा पर्यायाने आंबेडकरांचा अपमान केला आहे ... ज्ञानेश्वरांना बहिष्कृत करणारा त्यावेळचा कर्मठ ब्रम्हवृंद आणि आत्ता भाऊ कदमला बहिष्कृत करणारा भिमवृंद यात काय फरक आहे ...???
बरं यात फक्त हिंदू धर्मातील देवतास मानायचे नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे मग याचा अर्थ मुस्लिम अल्लाला व ख्रिश्चन मेरी, येशु व यहोवाला मानायचे का ?
आणि मग मी सर्व प्राणीमात्राचे लालनपालन करीन म्हणजे अहिंसावाद स्विकारीन , चोरी व व्यभिचार करणार नाही , खोटे कदापी बोलणार नाही या प्रतिज्ञा न पाळणार्या तुमच्या बांधवांचे काय ???
त्यांना कधी बहिष्कृत करणार ???
कि फक्त तुमच्या सोयी नुसार आंबेडकर वापरणार ...???
या प्रतिज्ञाच फक्त हिंदू आणि बौध्द समाजातील आपसातील द्वेष वाढवण्याचे मुळ आहे असे नाही वाटत का तुम्हाला ...???
या उलट अवतारवाद मानणारे हिंदू तत्वज्ञान बुध्दांनाही अवतारच मानते ते ही तुम्हाला मान्य नाही ...!!!
एकता , बंधुता व संघटित होऊन संघर्ष करायचे सोडुन फक्त हिंदूधर्मावर निशाणा साधण्याचा एक कलमी कार्यक्रम तुम्ही हाती घेतला आहे की काय ?
जो धर्म तुम्ही सोडलाय त्या विषयी बोलण्या ऐवजी आत्ता तुम्ही ज्या धम्मात आहात त्याचे नीट पालन केले तरी पुरेसे होणार नाही का ?
राजकारणात एकत्रित संघर्ष करणे सोडून असंख्य तुकड्यात विभागलेल्या तुमच्या नेत्यांना पहिले जाग्यावर आणा की राव ...!!!
तुमचे लोक तर अत्यंत कट्टरवादी मुस्लिम संघटनेशीही हात मिळवणी करतात ... जय मिम जय भिम चा नारा लावतात ...!!!
तो :- हो ... कारण शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र मानतो आम्ही ...!!!
( असा राग आला होता ...पण तरी संयम न सोडता संवाद चालु ठेवला )
मी :- अहो साहेब ... ज्या नवीन मित्रा विषयी तुम्ही सांगताय त्या विषयी आंबेडकराचे विचार काय होते याचा अभ्यास करा ... मग आपण यावर बोलू ...!!!
ईस्लामच्या दृष्टीने तुम्ही ही काफिरच आहात ... ज्याला तुम्ही आता मित्र मानताय तो कधीही तुमचा गळा घोटेल ... जरा ईतिहास पाहा त्यांचा ...!!!
गौतम बुध्दांना बोधी वृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्ती झाली म्हणून बोधीवृक्षाच्या फांद्या जगभर वाटून कुठला विज्ञानवाद तुम्ही जोपासता?
जयंतीच्या दिवशी आपापली वैज्ञानिक कामे सोडून बुध्दांच्या आणि आंबेडकराच्या फोटोला हार घालून व मेनबत्त्या पेटवून तुम्ही कुठल्या श्रध्दा जोपासता ...???
काय झाले शेवटी ?
ब्राह्मण घालवला भंते आला ,
रामकृष्णाच्या जागी भीमबुध्द आले ,
प्रार्थना सोडली वंदना आली ,
अगरबत्ती गेली मेनबत्ती आली ,
धर्म सोडला धम्म स्विकारला ,
भगवा टाकून निळा घेतला ,
उपासना जाऊन विपश्यना झाली ,
पण यातून अंतरंगे किती बदलली ?
अहो महाशय ... जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत . सर्वच सर्वगुण संपन्न आणि निर्दोष आहेत असे नाही ... सर्वातच गुण वा दोष कमी अधिक प्रमाणावर आढळून येतील ... त्यासाठी प्रत्येकाने आपल्या अंतर्गत असलेले दोष कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ...पण माणूस असे करताना दिसत नाही , तो दुसऱ्यांचे दोष फक्त दाखवत असतो ... अतिरेकी पणा वाढत जाऊन आतंकवादाचा जन्म होतो ... वर्चस्ववादास खतपाणी मिळून सामाजिक स्वास्थ्य बिघडून जाते ...!!!
सामाजिक प्रबोधन करण्या अगोदर स्वतःच स्वतःच्या मनात डोकावून पाहायला हवे ...!!!
सामाजिक समतोल राखायचा असेल तर एवढे तुम्ही कराच ... हेच एक मोठं भिमकार्य आहे असे मानून कामाला लागा ...!!!
एवढे बोले पर्यंत समोरील व्यक्तीच्या चेहर्यावरील भाव अनेकदा बदलत होते ... !!!
शेवटी चर्चा केल्या बद्दल आम्ही दोघांनी एकमेकांचे आभार मानले ... जातांना त्यांनी नमस्कार केला तसा मी ही नमस्कार केला ...!!!
ते निरोप घेऊन निघाले , तसे मला काहीतरी विसरल्याचे जाणवले आणि लगेच आठवलेही ...!!!
ओ....साहेब ... जय भिम ...!!!
पण प्रत्युत्तर आले नाही ...!!!
-
रविन्द्र किसनराव झांबरे
होळकरवाडी (पुणे)े
Monday, 19 June 2017
माझे बाबा
माझे बाबा
आज माझे बाबा ( बाप्पु) नव्वदीत आहेत . सात बहिणी नंतर बाप्पुंचा जन्म झाला , तो ही जन्माष्टमीला आणि म्हणून त्यांचे नाव आजोबांनी ठेवले कृष्णा ...!!!
कुटुंबाची जबाबदारी कमी वयातच त्त्यांच्याकडे आली .
आम्ही सात भावंडे ,४ बहिणी नंतर आम्ही ३ भाऊ..!!!
अर्थार्जनाचे साधन म्हणजे फक्त तुटपुंजी शेती , तीही संपूर्णपणे पावसावर अवलंबून आणि जिरायती ...!!!
अशाही स्थितीत न डगमगता बाप्पुंनी वेळेवर योग्य पिके घेऊन आम्हा भांवडाची शिक्षणे पुर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली ...!!!
शेती सांभाळून भजन , भारूड आणि सामाजिक कार्यात सुद्धा बाप्पुंचे नाव संपूर्ण हडपसर पंचक्रोषीत आजही मोठ्या आदराने घेतले जाते ...!!!
बाप्पु स्वतः पैलवान होते , तसेच हाडवैद्यही होते . ही कला त्यांनी आमच्या आजोबांकडून घेतली होती ..!!!
कसलाही मोबदला न घेता बाप्पुंनी हे हाडवैद्याचे काम केवळ एक समाजसेवा म्हणून केले . ते स्वतः हार्मोनियमवादक आहेत , वयाच्या नव्वदीत सुद्धा ते भजनात तल्लीन होऊन जातात .
संपूर्ण पंचक्रोशीतील विवाह सोहळ्यात मंगल अष्टके म्हणण्यात त्यांचा कायम पुढाकार असायचा आणि आजही आहे ..!!!
अजूनही बाप्पुंची प्रचंड ईच्छाशक्ती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरते ...!!!
Thursday, 2 February 2017
कानिफनाथ रसवंतीवाला
;लोकशाहीर बाळु आप्पा गवळी यांनी माझ्या वव्यवसायावर लिहीलेली कविता ...!!!
कानिफनाथ रसवंतीवाला
=================
दुकानाचे नाव कानिफनाथ लय भारी
रविंद्र झांबरे पाटील आहे कारभारी
बदलापुरला सार्या वाटतो हेवा
भक्तीभावाने करतो नाथाची सेवा ।।धृ।।
ऊसाचा रस देतो स्वच्छ गाळुनी
लिंबू अद्रक आणि बर्फ घालूनी
पुरवी जनतेला सुखाचा मेवा ...॥१॥
ऊसाचा रस औषधी फार
कावीळीला करी तडीपार
आहे ईश्वरी गुणाचा ठेवा ...॥२॥
गिर्हाईकाचा ठेवुनी मान
करतो रोखीचा धंदा छान
धरी सर्वांप्रती सम भावा ...॥३॥
आहे भल्या संगती भला
नाठाळाच्या देतो माथी टोला
अशा माणसाला सुखी ठेव देवा ...॥४॥
-
शाहीर बाळु आप्पा गवळी (बदलापुर)
Saturday, 14 January 2017
माझी आवडती भलरी आणि गणगवळण गिते
१} भलरी गित
अहो रामा हो रामा रामा
रामाच्या बागमदी हो बागंमदी
चावर्या मोटा दोन्ही वं मोटा दोन्ही
पाटानी वाहतयं पाणी व झुळझुळवानी
मोट हाकीतो हौशा धनी वं हौशा धनी
अहो रामा हो रामा रामा ....
राहीबाई गं राहीबाई गं
तुझा जुनरी वाडा
वाड्याला वाड्याला तुझ्या
खिडक्या चार
खिडक्याला खिडक्याला गडे
काढीले मॉर
मोराला मोराला तुझ्या
रेशमी गोंडं
रेशमी गोंडं वार्यावं डुलं
राहीबाई गं राहीबाई गं तुझा
जुनरी वाडा
राहीबाई गं राहीबाई गं तुझा
जुनरी वाडा
अहो रामा हो रामा रामा
अहो रामा हो रामा रामा
भलरी दादा
भलगडी दादा
भलरी दादा
भलगडी दादा
२} गणराया झाला सभापती -
मंडप फुलला मेळा जमला
गणराया झाला सभापती
पहीलं पाऊल पहिला मुजरा
सादर करीतो कलाकृती
मंडप फुलला ...कोरस (2)
देवादीकानो हे रसिकानो
आशीर्वाद द्या तुमचा हो
तालावरती सुर लागता
खेळ रंगला आमचा हो
पहीलं पाऊल पहिला मुजरा
सादर करीतो कलाकृती
मंडप फुलला ...कोरस (2)
येती अप्सरा करीती नखरा
कवन सागरा ये भरती
सुदबुद हरली तहानभूक सरली
नाचू लागली मदनरती
पहीलं पाऊल पहीला मुजरा
सादर करीतो कलाकृती
मंडप फुलला मेळा जमला
गणराया झाला सभापती ...!!!
३} हे गण नायक -
हे गण नायक सिद्धी विनायक
सुख वरदायक तुज नमितो ...
गजमुखदायक तु जग पालक
मी तव बालक तुज नमितो...
गणगवळण झाली सुरु
पायी घुंगरु लागे थरथरू
उडाली घाई
सुर तालाला मारी मिठी
प्रितीची मिठी फुटावी ओठी
शब्दांची लाली ....जीजीरं जीजी रामा जीजीरं जी (कोरस)
सभाजनांची झाली गर्दी
जमले बहु दर्दी लागली वर्दी
शिवाच्या कानी ...कोरस
गणगोत करूनी गोळा
नटेश्वर भोळा की लगबग आला
कैलासा वरूनी ...कोरस
संगती बाळ रुपडे
गजानन पुढे
बघती चहुकडे
कौतुका पोटी ...कोरस
द्या वरदान रसिका वरा
तुमच्या लेकरा
आशीर्वाद करा
आस ही मोठी ...कोरस
तुम्ही उदार आश्रय दिला
म्हणून ही कला
जगाला दिसली
आहे जोवरी तुमची कृपा
तोवरी वान आम्हाला कसली ...कोरस (2)ू