Monday, 19 June 2017

माझे बाबा

माझे बाबा

  आज माझे बाबा ( बाप्पु) नव्वदीत आहेत . सात बहिणी नंतर बाप्पुंचा जन्म झाला , तो ही जन्माष्टमीला आणि म्हणून त्यांचे नाव आजोबांनी ठेवले कृष्णा ...!!!
  कुटुंबाची जबाबदारी कमी वयातच त्त्यांच्याकडे आली . 
आम्ही सात भावंडे ,४ बहिणी नंतर आम्ही ३ भाऊ..!!!
अर्थार्जनाचे साधन म्हणजे फक्त तुटपुंजी शेती , तीही संपूर्णपणे पावसावर अवलंबून आणि जिरायती ...!!!
       अशाही स्थितीत न डगमगता बाप्पुंनी  वेळेवर योग्य पिके घेऊन आम्हा भांवडाची शिक्षणे पुर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली ...!!!
      शेती सांभाळून भजन , भारूड आणि सामाजिक कार्यात सुद्धा  बाप्पुंचे नाव संपूर्ण हडपसर पंचक्रोषीत आजही मोठ्या आदराने घेतले जाते ...!!!
बाप्पु स्वतः पैलवान होते , तसेच हाडवैद्यही होते . ही कला त्यांनी आमच्या आजोबांकडून घेतली होती ..!!!
   कसलाही मोबदला न घेता बाप्पुंनी हे हाडवैद्याचे काम केवळ एक समाजसेवा म्हणून केले . ते स्वतः हार्मोनियमवादक आहेत , वयाच्या नव्वदीत सुद्धा ते भजनात तल्लीन होऊन जातात .
संपूर्ण पंचक्रोशीतील विवाह सोहळ्यात मंगल अष्टके म्हणण्यात त्यांचा कायम पु�ढाकार असायचा आणि आजही आहे ..!!!
     अजूनही बाप्पुंची प्रचंड ईच्छाशक्ती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरते ...!!!